Thursday, 20 April 2017

Road Accident Ek Real Ghatana

बाणेर येथे झालेल्या भीषण अपघातात काल (ता १७) एका चिमुरडीचा (वय वर्ष ४) आणि तिच्या आईचा मृत्यू झाला. सोबत असणारेही जखमी झाले. अपघात झाल्यानंतर विसाव्या मिनिटाला चतुःश्रींगी पोलीस स्टेशन येथे चार वकील अपघात ज्या महिले मुळे झाला तिच्या बचावासाठी हजार झाले होते. पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर "श्रॉफ बिल्डर्स' यांची पत्नी हि कार चालवत होती. अपघात होऊन चोवीस तसहि झाले नाहीत तरी या महिलेला बेल सुद्धा मिळाली आहे. 
आता हा खटला कोर्टात उभा राहील. बचाव पक्ष अनेक मुद्दे उपस्थित करेल. - रस्त्यावरचा चुकीचा डिव्हायडर हि कशी प्रशासनाची चूक आहे- रस्त्यावरच अचानक येणार वळण या मुळे कुठल्याही चालकाचे नियंत्रण जाऊ शकते असे अनेक मुद्दे उपस्थित केले जातील. मान्य आहे महिलेच इंटेंशन हो कोणाला मारण्याचे नव्हते अरे पण ज्यांनी चूक केलीये त्याला त्याची जाणीव होईल असा काहीतरी होऊ द्या. असाच खटला अनेक वर्षे चालतो. 
 ज्या हॉस्पिटल मध्ये या सगळ्यांना नेला त्या हॉस्पिटल ने तर आत्तापर्यंत ८ लाखाचे बिल सुद्धा लावले आहे. या उप्पर म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमान पत्राने तर या माहिलेचे नावं सुद्धा बातमी मध्ये दिलेले नाही. ज्यांनी अपघात बघितला, जे या मध्ये वारले, जखमी झाले त्या सगळ्यांची नवा आहेत पण जिच्यामुळे हा अपघात घडला तिचा साध नाव सुद्धा बातमी मध्ये लिहू नये - का तर कुठल्या तरी अतिश्रीमंत माणसाची हि पत्नी आहे (मान्य आहे तिचा इंटेंशन नव्हत .. अरे तरी काही तरी लाज बाळगा). अशा अपघातातून जनतेने, प्रशासनाने, पोलिसांनी आणि आरोपींनी जे शिकायला हव ते राहिला बाजूला आणि सगळे जण या अपघाताचा बाजार करायला तयार झाले आहेत. हे असा पुन्हा पुन्हा का ? एक सलमान खान चा अपघात आणि त्यावरचा खटला आपल्याला शिकायला पुरेसा नाही का ? काल त्या डिव्हायडर वर ती आई आणि तिची चिमुरडी होती उद्या त्या डिव्हायडर वर तुम्ही हि असू शकता .











;-










;

Monday, 13 February 2017

बीडमध्ये जाऊन रामदास कदम यांची पंकजा मुंडेंवर तुफान टीका




बीड ( दिनवार्ता ) राज्यात सध्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यात शिवसेना-भाजपची युती तुटल्याने दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तुफान टीका करत आहेत. बीडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे रामदास कदम यांची प्रचार सभा झाली.
पंकजा मुंडे जमिनीवर कधीच नसतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे लोकांमध्ये असायचे, असे म्हणत रामदास कदम यांनी पंकजा यांच्यावर हल्लाबोल केला.
“पंकजा मुंडे म्हणतात, मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री. या मंत्र्यांचे फोन घेत नाहीत, जनतेचे कधी घेणार?”, असा टोलाही रामदास कदम यांनी पंकजा मुंडेंना बीडमधील सभेत लगावला. शिवाय, ‘पकंजा ताई, मी पण आहे भाई’, असेही रामदास कदम म्हणाले.
विश्वासघात खातं भाजपकडे
विश्वासघात हे खातं भाजपकडे आहे. शिवसेना विश्वासघात करत नाही, असे सांगताना रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. “मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला भाषणात फेस आला, हे काम शिवसेनेने केले. फडणवीस, बिहारचे मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, गुंडांची भाषा बोलू नका.”, असे रामदास कदम म्हणाले.

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीकडून हत्या

नरेंद्रनगर ( दिनवार्ता ) : मद्य प्राशन करून रोज घरी भांडण करण्यासह पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने रागाच्या भरात डोक्यावर हातोडीने वार करून हत्या केली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे नरेंद्र नगरच्या आदिवासी सोसायटीत खळबळ उडाली.
तिलक गुलाबसिंग मडावी (४६) असे मृताचे तर राणी तिलक मडावी (४४) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. दोघेही मध्य प्रदेशातील असले तरी सध्या नागपूरच्या प्लॉट नं. ४७, आदिवासी सोसायटी, नरेंद्र नगर, जगदीश हरीदास गोलाईत यांच्या घरी भाडय़ाने घरी राहतात. त्यांना दोन मुले असून एक २० वर्षीय मुलगा नागपूरला तर दुसरा मध्य प्रदेशात त्यांच्या नातेवाईकाकडे राहतो. तिघेही नळ जोडणीसह विविध कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तिलकला मद्याचे व्यसन असून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलालाही त्रास देत होता. शनिवारी त्याने घरी मुलासोबत वाद घातला. शेजारील मुलाच्या मित्रांच्या निदर्शनात हा प्रकार आल्यावर त्यांनी मध्यस्थी करून मुलाला बाहेर नेले. काही वेळाने पतीने पत्नीशी वाद घालणे सुरू केले. पत्नीला शिवीगाळ केल्याने तिचा राग अनावर झाला. तिने घरातील हातोडीने पतीच्या डोक्यावर व त्यानंतर शरिराच्या विविध भागावर वार केले. शेजारच्यांनी खिडकीतून घरात डोकावून बघितले असता त्यांना हा प्रकार दिसला. काहींनी घरात प्रवेश करून जखमी तिलकला मेडिकलमध्ये हलवले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

Sunday, 12 February 2017

कराड ( दिनवार्ता ): मलकापूर येथील श्रेणी मेडिकल एजन्सीजने 40 लाख 29 हजार 917 रुपये किमतीची बोगस बिले करून सुहाग्रा टॅब्लेटस्ची आणि 40 हजार 168 रुपयांची बोगस बिले करून केटामाईन इंजेक्शनची विक्री केल्याचे दि. 1 फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत आढळल्याने श्रेणी मेडिकलचे मालक योगेश नाथमल गेलडा यांच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात औषध, सौंदर्य प्रसाधन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अन्न व औषध प्रशासनाचे सातारा विभाग सहाय्यक आयुक्त सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक सविता दातीर यांनी दि. 1 फेब्रुवारी रोजी मलकापूर येथील श्रेणी मेडिकल एजन्सीजची तपासणी केली. त्यामध्ये औषधांच्या विक्रीत आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्याने दातीर यांनी औषध निरीक्षक  व्ही. व्ही. नांगरे यांना बोलावून घेऊन अधिक तपासणी केली. त्यामध्ये श्रेणी मेडिकलमधून सुहाग्रा टॅब्लेटस्ची (40 लाख 29 हजार 917 रुपये) बोगस बिले करून विक्री केल्याचे आढळले. त्याचबरोबर 11 हजार 677 रुपये किमतीची केटामाईनची 100 इंजेक्शन्स विनापरवानाधारकाला (शेड्युल एक्स) विक्री केल्याचेही निदर्शनास आले. श्रेणी मेडिकलने 28 हजार 491 रुपये किमतीची 289 केटामाईन इंजेक्शन्स कृष्णा हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्सच्या नावे बोगस बिले करून विक्री केल्याचे आढळले. या जोखमीच्या औषधांची बोगस बिले आढळली. सुहाग्रा टॅब्लेटस् लैंगिक उत्तेजक औषध असून केटामाईन इंजेक्शन भुलीसाठी वापरले जाते. याचा अवैधरीत्या वापर रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठीही केल्याचे अनेक ठिकाणी आढळले आहे. केटामाईन इंजेक्शनच्या खरेदी-विक्रीबाबत कडक नियम करण्यात आले आहेत.
या प्रकरणी सविता दातीर यांनी श्रेणी मेडिकलचे मालक योगेश नाथमल गेलडा   यांच्या विरोधात औषध, सौंदर्य प्रसाधन कायद्यान्वये कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान तपास करत आहेत. ही औषधे नक्की कोणाला विकली, याचा तपास पोलीस करत आहेत.
आक्षेपार्ह बाबी आढळल्यास कारवाई
मेडिकल स्टोअर्स व एजन्सीची अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने नियमित तपासणी करण्यात येते. त्यामध्ये औषधांच्या खरेदी-विक्रीत आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास कडक कारवाई करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त सुरेश पाटील यांनी सांगितले.

Wednesday, 8 February 2017

आमच्या बद्दल

‘खेडयाकडे चला’’ या म.गांधीजींच्या घोरणेतून प्रेरणा घेवून गावाकडच्या बातम्यांना प्राधान्य देण्यासाठी दिनवार्ता मल्टीमिडीया प्रा.लि. या कंपनीने दिनवार्ता – गावाकडच्या बातम्या हे मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपाचे न्यूज पोर्टल दि. 26 जानेवरी 17 रोजी पासून सुरू केले आहे. जागतीकीकरणाच्या रेटयामुळे लोक नोकरी व्यवसायासाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदि शहरांकडे स्थलातंर करत आहेत. व काही परदेशीही जात आहेत. काही कालावधी नंतर शहरांमध्येच कायम वास्तव्य करून राहतात. परंतु या शहरीकरणामुळे या नागरिकांचा आपल्या गावाशी संपर्क उरलेला नाही. त्यामुळे आपल्या गावाकडे सध्या काय चालू आहे या विषयी त्यांच्यात उत्सुकता वाटत असते. त्यामुळे दिनवार्ता या वेब पोर्टलवर गावाकडच्या बातम्यांना प्राध्यान दिले जाणार आहे. याव्दारे ताज्या घडामोडी, बातम्या, विश्लेषणात्मक लेख, उपयुक्त माहिती, आॅफ बिट बातम्या, 24/7 अधिकाधिक नागरिकांपर्यत पोहचवण्याचा आमच्या प्रयास आहे,

महाराष्ट्रातील सर्व शहरांच्या नावानुसार वाचकांना आपल्या गावापर्यंत पोहचून तेथील बातम्या वाचता/पाहता येतील. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करता येईल. सूचना मांडता येतील. राजकरण, समाजकारण, अर्थकारण, क्रिडा, कला, मनोरंजन, शेती, साहित्य या नुसार कॅटेगरी केल्या आहेत.

डबलू डब्लू डब्लू डाॅट दिनवार्ता डाॅट काॅम या न्युज पोर्टलवर  बातम्या वाहिन्याच्या धर्ताीवर चोवीस तास लाईव्ह  बातम्या दाखवण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका स्तरावर वार्ताहर / प्रतिनिधी नेमून तळागाळातील, गाव, वस्ती, पातळीवरील बातम्या संकलित करून दिनवार्ता डाॅट काॅम वर प्रकाशित करण्यात येतील.