आमच्या बद्दल
‘खेडयाकडे चला’’ या म.गांधीजींच्या घोरणेतून प्रेरणा घेवून गावाकडच्या बातम्यांना प्राधान्य देण्यासाठी दिनवार्ता मल्टीमिडीया प्रा.लि. या कंपनीने दिनवार्ता – गावाकडच्या बातम्या हे मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपाचे न्यूज पोर्टल दि. 26 जानेवरी 17 रोजी पासून सुरू केले आहे. जागतीकीकरणाच्या रेटयामुळे लोक नोकरी व्यवसायासाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदि शहरांकडे स्थलातंर करत आहेत. व काही परदेशीही जात आहेत. काही कालावधी नंतर शहरांमध्येच कायम वास्तव्य करून राहतात. परंतु या शहरीकरणामुळे या नागरिकांचा आपल्या गावाशी संपर्क उरलेला नाही. त्यामुळे आपल्या गावाकडे सध्या काय चालू आहे या विषयी त्यांच्यात उत्सुकता वाटत असते. त्यामुळे दिनवार्ता या वेब पोर्टलवर गावाकडच्या बातम्यांना प्राध्यान दिले जाणार आहे. याव्दारे ताज्या घडामोडी, बातम्या, विश्लेषणात्मक लेख, उपयुक्त माहिती, आॅफ बिट बातम्या, 24/7 अधिकाधिक नागरिकांपर्यत पोहचवण्याचा आमच्या प्रयास आहे,
महाराष्ट्रातील सर्व शहरांच्या नावानुसार वाचकांना आपल्या गावापर्यंत पोहचून तेथील बातम्या वाचता/पाहता येतील. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करता येईल. सूचना मांडता येतील. राजकरण, समाजकारण, अर्थकारण, क्रिडा, कला, मनोरंजन, शेती, साहित्य या नुसार कॅटेगरी केल्या आहेत.
डबलू डब्लू डब्लू डाॅट दिनवार्ता डाॅट काॅम या न्युज पोर्टलवर बातम्या वाहिन्याच्या धर्ताीवर चोवीस तास लाईव्ह बातम्या दाखवण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका स्तरावर वार्ताहर / प्रतिनिधी नेमून तळागाळातील, गाव, वस्ती, पातळीवरील बातम्या संकलित करून
दिनवार्ता डाॅट काॅम वर प्रकाशित करण्यात येतील.