कराड ( दिनवार्ता ): मलकापूर येथील श्रेणी मेडिकल एजन्सीजने 40 लाख 29 हजार 917 रुपये किमतीची बोगस बिले करून सुहाग्रा टॅब्लेटस्ची आणि 40 हजार 168 रुपयांची बोगस बिले करून केटामाईन इंजेक्शनची विक्री केल्याचे दि. 1 फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत आढळल्याने श्रेणी मेडिकलचे मालक योगेश नाथमल गेलडा यांच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात औषध, सौंदर्य प्रसाधन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अन्न व औषध प्रशासनाचे सातारा विभाग सहाय्यक आयुक्त सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक सविता दातीर यांनी दि. 1 फेब्रुवारी रोजी मलकापूर येथील श्रेणी मेडिकल एजन्सीजची तपासणी केली. त्यामध्ये औषधांच्या विक्रीत आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्याने दातीर यांनी औषध निरीक्षक व्ही. व्ही. नांगरे यांना बोलावून घेऊन अधिक तपासणी केली. त्यामध्ये श्रेणी मेडिकलमधून सुहाग्रा टॅब्लेटस्ची (40 लाख 29 हजार 917 रुपये) बोगस बिले करून विक्री केल्याचे आढळले. त्याचबरोबर 11 हजार 677 रुपये किमतीची केटामाईनची 100 इंजेक्शन्स विनापरवानाधारकाला (शेड्युल एक्स) विक्री केल्याचेही निदर्शनास आले. श्रेणी मेडिकलने 28 हजार 491 रुपये किमतीची 289 केटामाईन इंजेक्शन्स कृष्णा हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्सच्या नावे बोगस बिले करून विक्री केल्याचे आढळले. या जोखमीच्या औषधांची बोगस बिले आढळली. सुहाग्रा टॅब्लेटस् लैंगिक उत्तेजक औषध असून केटामाईन इंजेक्शन भुलीसाठी वापरले जाते. याचा अवैधरीत्या वापर रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठीही केल्याचे अनेक ठिकाणी आढळले आहे. केटामाईन इंजेक्शनच्या खरेदी-विक्रीबाबत कडक नियम करण्यात आले आहेत.
या प्रकरणी सविता दातीर यांनी श्रेणी मेडिकलचे मालक योगेश नाथमल गेलडा यांच्या विरोधात औषध, सौंदर्य प्रसाधन कायद्यान्वये कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान तपास करत आहेत. ही औषधे नक्की कोणाला विकली, याचा तपास पोलीस करत आहेत.
आक्षेपार्ह बाबी आढळल्यास कारवाई
मेडिकल स्टोअर्स व एजन्सीची अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने नियमित तपासणी करण्यात येते. त्यामध्ये औषधांच्या खरेदी-विक्रीत आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास कडक कारवाई करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त सुरेश पाटील यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment